Home /News /maharashtra /

Bihar Election Results : 'बिहार तो एक झाकी है, महाराष्ट्र-बंगाल अभी बाकी हैं'

Bihar Election Results : 'बिहार तो एक झाकी है, महाराष्ट्र-बंगाल अभी बाकी हैं'

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election Result) एनडीएने (NDA) जोरदार आघाडी घेतली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे देशभरातील भाजप (BJP)कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

    नाशिक, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election Result) एनडीएने (NDA) जोरदार आघाडी घेतली आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे देशभरातील भाजप (BJP)कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी 'बिहार तो एक झाकी है, महाराष्ट्र-बंगाल अभी बाकी हैं' अशा घोषणा देत पेढे वाटून जल्लोष केला आहे. नाशिकमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला आहे. बिहारमध्ये भाजपने जास्त जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली होती. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. आतापर्यंत एनडीएने 4 वाजेपर्यंत 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर जदयूने (JDU) 12 जागांवर आणि भाजपने 26 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने (MGB) 27 जागा जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत संजय राऊतांचा काँग्रेसला टोला, म्हणाले... भाजपने पहिला विजय हा दरभंगातील केवटी मतदारसंघातून मिळवला आहे.  भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहे. त्यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दिकीचा पराभव केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातून आघाडीवर असलेल्या जागा आता विजयात रुपांतरीत झाल्या आहे. आतापर्यंत भाजपने 16 जागा जिंकल्या आहेत.  भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडयू 46 जागांवर आघाडीवर आहे. एनडीएने सर्वाधिक 124 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 122 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे. एक पाय नसूनही खेळतो फुटबॉल; VIDEO पाहून चिमुरड्याच्या जिद्दीला कराल सलाम! आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आधारावर भाजप आणि जदयू यांच्या NDA ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असं भाजप नेतेही सांगू लागले आहेत. पण निवडणूक आयोगाने आत्ताच दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 25 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. अजूनही 4 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे निकाल फिरण्याचीही शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Nashik

    पुढील बातम्या