Home /News /maharashtra /

Bihar Election Results: बिहारमध्ये 'जंगलराज' समाप्त होऊन 'मंगलराज' सुरू, संजय राऊतांचा नितीशकुमारांन टोला

Bihar Election Results: बिहारमध्ये 'जंगलराज' समाप्त होऊन 'मंगलराज' सुरू, संजय राऊतांचा नितीशकुमारांन टोला

    मुंबई, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तेजस्वी यादव (RJD Leader Tejashwi Yadav) यांना जनतेची उत्तम साथ लाभत आहे. महागठबंधनने जोरदार मुसंडी मारली आहे. महागठबंधन 124 जागांवर एनडीए 87 जगांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महागठबंधन आणि एनडीएमध्ये 'काँटे की टक्कर' पाहण्यास मिळत आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना टोला लगावला आहे. बिहारमध्ये 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं आहे. आता 'मंगलराज' सुरू झालं आहे. हेही वाचा..तेजस्वी यादव यांची मोदींना 'काँटे की टक्कर', भाजपपेक्षा जास्त जागांवर आघाडी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी लाट आली आहे. तेजस्वी यांना बिहार जनतेची उत्तम साठ मिळत आहे. जदयू (JDU)चे प्रवक्ता के.सी. त्यागी म्हणत आहे, त्यांना कोविड-19 चा फटका बसला. म्हणजे ते नागरिकांना सुविधा देण्यात सपशल अपयशी ठरले आहेत. 30 वर्षांत एका बिहारी तरुणानं थेट केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये आता 'तेजस्वी लाट' आली आहे. बिहारमध्ये 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं आहे. आता 'मंगलराज' सुरू झालं आहे. महाराष्ट्राच्या मुद्यावर बिहारमध्ये निवडणूक लढणाऱ्या भाजपलाही जनतेनं सपशेल नाकारल्याचं दिसत आहे. देशात परिवर्तनाला महाराष्ट्रातून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र याबाबत कायम अग्रेसर राहील, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, संजय राऊत यांनी काळ कसं रुप बदलतो, यावरून एक ट्वीट केलं आहे. 'बादशाह तो वक्त होता है. इंसान तो यूं ही गुरुर करता है' असं राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, राऊत यांच्या या ट्वीटचा संबंध बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी तर कोणी अर्नब गोस्वामी यांच्याशी जोडला. दरम्यान, बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून आज 38 जिल्ह्यासाठी मतमोजणी ही 55 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. बिहारमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार महागठबंधन जागांवर आघाडीवर आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 122 जागा आवश्यक. सध्या एनडीए 89 जागांवर आघाडी, आरजेडी 86, काँग्रेस 28 तर लेफ्ट 10 जागांवर आहेत... भाजप 50 तर जेडीयू 35 जागांवर आघाडीवर आहे. काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे? निकाला आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) समोर आले आहे बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे. हेही वाचा..मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारला मोठा दिलासा, ज्योतिरादित्य शिंदेंनी करून दाखवले विशेष म्हणजे, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण धुरा त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठीही तेजस्वी यादव यांचाच चेहरा पुढे करण्यात आला. निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली आणि नवख्या तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar Election, Nitish kumar, Sanjay raut

    पुढील बातम्या