रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्याप्रकरणी आरोपी निर्दोष

पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांना पोलिसांनी अटक केली होती.

  • Share this:

मोहन जाधव, रायगड, 25 जानेवारी : रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 2012 हटवला होता. या प्रकरणी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांना पोलिसांनी अटक केली होती. माणगाव सत्र न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला असून पुराव्याअभावी 73 जणांची सत्र न्यायाधीश जहांगीर यांनी निर्दोष सुटका केली आहे. या निकालाच्या अनुषंगाने माणगाव न्यायालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी आणि पुतळा जगदीश्वर मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या मागे आहे. 2012 साली वाघ्या कुत्राचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता.

संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना महाड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर दरोडा घालण्याचा आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गाड्याही जप्त केल्या होत्या. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी काही तासातच कार्यकर्त्यांना अटक केली होती.

कारखान्याने 3 वर्षांपासून पगारच न दिल्याने कर्मचाऱ्याची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास पत्नीचा नकार

महाड न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविला होता. महाड न्यायालयातून हा खटला माणगाव न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. माणगाव न्यायालयात वाघ्या कुत्रा हटविल्या संदर्भात आज खटला सुरू होता.

यावेळी न्यायालयाने कार्यकर्त्यांविरोधात कोणताही पुरावा नसल्याने सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. त्यामुळे आठ वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 12:40 PM IST

ताज्या बातम्या