मुंबई, 23 जून : सध्या महाराष्ट्रात कोरोनाचं संकट असताना पालिकांमध्येही मोठा फेरफार होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाली होती. त्यानंतर आता ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे. त्या पदावर डॉ. बिपीन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातले पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये दिल्यानुसार डॉ. बिपीन शर्मा हे विदेशी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. तिथून आल्यानंतर त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारावा असं कुंटे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.
ठाण्यात 3 महिन्यात 2 आयुक्तांच्या बदल्या झाल्याची माहिती आहे. काहींच्या मते ठाण्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचा हा परिणाम आहे.
हे वाचा-Coronavirus महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढल्याने थोडा दिलासा; रुग्णवाढ कायम
त्यानंतर संजीव जयस्वाल यांच्या जागी विजय सिंघल यांच्याकडे आयुक्तपद देण्यात आले होते. पाच वर्षांनी ठाणे महापालिकेला नवे आयुक्त मिळाले होते. मात्र आता त्यांची बदली करण्यात आली आहे. मार्च २०२० ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली होती. ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अतिरिक्त आयुक्तांकडे पदभार देऊन सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Mum thane