मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी : पुन्हा 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, मुंबईजवळच्या शहराने घेतला निर्णय

मोठी बातमी : पुन्हा 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, मुंबईजवळच्या शहराने घेतला निर्णय

लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढू लागली आणि त्यासोबतच कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली.

लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढू लागली आणि त्यासोबतच कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली.

लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढू लागली आणि त्यासोबतच कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली.

अंबरनाथ, 22 जून : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्यानंतर लगेचच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारने देशभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यात भारताला यश आलं नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू लागला आणि सरकारने टप्प्या-टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढू लागली आणि त्यासोबतच कोरोनाबाधितांची संख्याही वाढू लागली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही शहरांकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. वसई-विरार पाठोपाठ आता अंबरनाथ शहरातही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबरनाथ शहरात 8 दिवस शहरात कडकडीत बंद असणार आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णय घेतला गेला आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत. दूध,फळे, पालेभाज्या यांची घरपोच सोय तर दवाखाने, मेडिकल सुरू राहतील, असं सांगण्यात आलं आहे. अंबरनाथमध्ये 23 जून पासून 30 जून पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. वसई-विरारमध्येही लॉकडाऊन वसई-विरार मधील 5 प्रभाग समित्यांमध्ये 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करून सील करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. वसई विरारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. हा कोरोना रुग्णांचा आकडा रोखणे पलिकेसमोर मोठे आव्हान ठरतं आहे. महापालिकेने सर्वेक्षण करुन सर्वाधिक रूग्ण व मृत व्यक्ती आढळलेला परिसर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता शहरातील 5 प्रभागात 14 दिवसांची कडक टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार 18 जूनपासून ही टाळेबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.
First published:

Tags: Ambernath, Lockdown

पुढील बातम्या