खळबळजनक! व्यापारी आत्महत्येप्रकरणी बारामतीत NCPच्या बड्या नेत्यासह 6 जणांना बेड्या

खळबळजनक! व्यापारी आत्महत्येप्रकरणी बारामतीत NCPच्या बड्या नेत्यासह 6 जणांना बेड्या

खासगी सावकारी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई

  • Share this:

बारामती, 18 नोव्हेंबर: बारामती शहरात खासगी सावकारीला कंटाळून व्यापारी प्रीतम शहा लेंगरेकर यांनी आत्महत्या केली होती. प्रीतम शहा यांच्या मृत्यूनंतर दिवाळीच्या पाडव्याला दुकान उघडल्यानंतर त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रसच्या एक बड्या नेत्यासह सहा पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

खासगी सावकारी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केल्यामुळे बारामती शहरासह पुणे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. अटक झालेल्यांमध्ये नगरसेवकांसह, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा...पत्नी विरह झाला नाही सहन, पतीनं फेसबुक Live करत रेल्वेसमोर मारली उडी

मिळालेली माहिती अशी की, शहरातील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्य केली होती. व्याजाच्या पैशासाठी बंगला नावावर करून घेण्यासाठी त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रसचे विद्यमान नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, तसेच एका निवृत्त पोलिसांच्या मुलासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, प्रीतम शहा यांना दिलेल्या व्याजाच्या पैशापोटी त्यांच्य सहयोग सोसायटीमधील बंगला नावावर करून घेण्यासाठी त्यांना आरोपी वारंवार मानसिक त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून प्रीतम शहा यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं होतं.

प्रीतम शहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहली होती. ही नोट त्यांच्या लेंगरेकर ट्रेडींग कॉर्पोरेशन या दुकानात सापडली. प्रीतम शहा यांच्या मृत्यूनंतर दिवाळीच्या पाडव्याला दुकान उघडल्यानंतर त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

हेही वाचा...मोठी बातमी: ऊसदराची कोंडी अखेर फुटली, एकरकमी एफआरपी देण्यास तयार

प्रीतम शहा यांचा मुलगा प्रतिक शहा यानं शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (रा. भिगवण रोड, बारामती), राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक जयसिंग अशोकराव काटे-देशमुख, (रा. पाटस रोड बारामती), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय कोंडीबा काटे (रा. काटेवाडी, ता.), विकास नागनाथ धनके (रा. इंदापूर रोड, बारामती), निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा मंगेश ओंबासे (रा.सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (रा. खाटिक गल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (रा. अशोकनगर, जैन मंदिराशेजारी,  बारामती), संघर्ष गव्हाळे (रा. बारामती) सनी उर्फ सुनील आवाळे (रा. खंडोबानगर) या नऊ जणांवर पोलिसांनी  सावकारी अधिनियम 2014 च्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 18, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या