मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिकच्या राजकारणातली मोठी बातमी, भाजपचा नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

नाशिकच्या राजकारणातली मोठी बातमी, भाजपचा नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे  भाजपाला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.

स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे भाजपाला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.

स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे भाजपाला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे.

नाशिक, 06 मार्च : नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना आता वेग येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  नाशिकच्या दौऱ्यावर आहे. भाजपच्या (BJP) नेत्याने हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे शुक्रवारपासून नाशिकमध्ये मुक्कामी आहे. पहिल्या दिवशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर आज सकाळी भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे भेटीसाठी पोहोचले. पालवे यांनी राज यांची भेट घेतली आणि चर्चा केली.  पालवे यांच्या भेटीमुळे मनसे भाजपला टाळी देणार का अशा चर्चांना ऊत आला आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेनं (MNS) भाजपला मदत केली होती. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे  भाजपाला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता नाशिकमध्ये भाजप आणि मनसेत जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे.  येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे भाजप युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती, या विवाहानिमित्त  राज ठाकरे आणि  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नाशिकमध्येच मुक्कामी आहे.

माजी महापौराला काढायला लावला मास्क

दरम्यान, शुक्रवारी शहरात सकाळी राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. यावेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क घातले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि 'मास्कवर मास्क' असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केले.

राज ठाकरे यांनी माजी महापौरांना मास्क काढण्याचा इशारा केल्यामुळे उपस्थितीत असलेल्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लगेच आपल्या चेहऱ्यावर लावलेले मास्क बाजूला केले आणि राज ठाकरे यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनीही मास्क लावलेले नव्हते.

First published:

Tags: BJP, Maharashtra, MNS, Mumbai, Raj Thackeray