महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी; संजय राठोडांचं भवितव्य पणाला; पुढील 24 तास महत्त्वाचे

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी; संजय राठोडांचं भवितव्य पणाला; पुढील 24 तास महत्त्वाचे

संजय राठोड प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर घेराव घातला जात आहे

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरण आणि कोरोनाचं संकट असताना पोहरादेवी येथे जमा झालेल्या मोठी गर्दीमुळे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आज भाजप नेता चित्रा वाघ यांनी नाशिक येथे पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर राठोड प्रकरणावरुन घणाघात केला. आताच हाती आलेल्या सूत्रांनुसार संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती हाती आली आहे.

संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे सरकारवर नामुष्की ओढवली असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अद्याप संजय राठोड यांच्याकडून अधिकृतपणे राजीनामा देणार असल्याची वा दिल्याची माहिती समोर आलेली नाही.

हे ही वाचा-राहुल गांधींच्या बायसेप्सवर जनता फिदा; हाच सर्वात फिट नेता असल्याचा दिला किताब

गेल्या अनेक दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड यांचे अनेक फोटो समोर येत आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वारंवार संजय राठोड यांना सवाल केला जात आहे. त्याशिवाय यापूर्वी आलेल्या 12 ऑडिओंमुळे हे प्रकरण अधिक क्लिष्ट झालं आहे. पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. आजही राज्यभरात विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली. मात्र अद्याप तरी त्यांनी राजीनामा दिल्याचं अधिकृत वृत्त समोर आलेलं नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: February 27, 2021, 6:34 PM IST

ताज्या बातम्या