Home /News /maharashtra /

मोठी बातमी! आदिवासी शाळेतील 70% विद्यार्थ्यांना कोरोना; 4 कर्मचाऱ्यांनाही संसर्ग

मोठी बातमी! आदिवासी शाळेतील 70% विद्यार्थ्यांना कोरोना; 4 कर्मचाऱ्यांनाही संसर्ग

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

शाळांचे सॅनिटायजेशन बंधनकारक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळांचं सॅनिटायजेशन बंधनकारक करण्यात आलं आहे.

हे विद्यार्थी 5 वी ते 9 वी इयत्तेतील आहे.

    वाशिम, 24 फेब्रुवारी : सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे निर्बंध अधिक कडक केले आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरातील आदिवासी निवासी शाळेमधील 327 पैकी 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Corona to 70 percent of students in tribal schools in washim 4 employees also infected) याशिवाय या निवासी शाळेतील 4 कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला आहे. हे विद्यार्थी 5 वी ते 9 वी इयत्तेतील आहे. यामध्ये यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, यवतमाळमधील 55, बुलडाणा जिल्ह्यातील 03, हिंगोली जिल्ह्यातील 08 आणि वाशिम जिल्ह्यातील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारी रोजी शाळेत दाखल झाले होते. सर्व विद्यार्थ्यांची RTPCR टेस्ट करण्यात आल्या नंतर संसर्गाचा उलगडा झाला. निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; फक्त या लोकांना मिळणार मोफत कोरोना लस महाराष्ट्रासह देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाचा (coronavirus) उद्रेक झाला आहे. या राज्यांमुळे आता केंद्र सरकारची चिंताही वाढली आहे. त्यामुळे तिथल्या कोरोनाला (covid 19) नियंत्रित करण्यासाठी आता केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती (high level teams) तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये उच्च स्तरीय मल्टीडिसिप्लिनरी टीम रवाना करण्यात आली आहे. हे पथक राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Covid cases, Covid-19 positive, Maharashtra, Washim

    पुढील बातम्या