• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मोठी बातमी! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; वाशिमच्या विद्यार्थ्याचं परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशात

मोठी बातमी! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ; वाशिमच्या विद्यार्थ्याचं परीक्षा केंद्र थेट उत्तर प्रदेशात

  'मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता...

'मंदिर उघडण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. गौरी गणपती सुरू असून आता...

अनेकांच्या प्रवेश पत्रिकेत बराच गोंधळ झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:
पुणे, 23 सप्टेंबर : आरोग्य विभागातील (Maharashtra Health Department) पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या (Health Department Recruitment 2021) हॉल तिकिटात संबंधित एजन्सीने प्रचंड गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. या गोंधळामुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय राऊत या उमेदवाराने वाशिम परीक्षा सेंट निवडलेले असताना त्याच्या हॉल तिकिटावर चक्क उत्तर प्रदेशातील नोएडा हे परीक्षा केंदाचा (Exam Centre) पत्ता छापून आला आहे. (Maharashtra Health department Job) त्यामुळे मी काय उत्तर प्रदेशात जाऊन पेपर देऊ का? असा उद्विग्न सवाल या परीक्षार्थीने आरोग्य विभागाला विचारला आहे. येत्या 26 सप्टेंबरला आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील 6200 पदांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. यासाठी तब्बल 8 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. पण अनेक परीक्षांर्थींचे हॉल तिकिटच डाऊनलोड होत नाही, तर काहींमध्ये प्रचंड चुका आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी या गोंधळात लक्ष घालावे अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत. 'न्यासा' या खासगी एजन्सीला या भर्तीचे कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे. (Mistakes in Maharashtra Health Department Recruitment Examination) आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या परीक्षा प्रवेश पत्रिकेमध्ये बराच गोंधळ आहे. काही प्रवेश पत्रामध्ये कॉलेज कोणतं आहे समजत नाही. कोणाच्या प्रवेश पत्रामध्ये वडिलांच्या नावाच्या जागी दुसऱ्याच व्यक्ती नाव आलं आहे. हे ही वाचा-'तीन दिवस, तीन बडे नेते'; किरीट सोमय्यांचं आघाडी सरकारला नवं चॅलेंज तर एका उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेश नोएडा मधल सेंटर आले आहे. काही मुलांचे लिंगाबाबत चुकीची माहिती दिली आहे. काहींच्या हॉल तिकिटावर फक्त कॉलेजच नाव आहे. जिल्ह्याचा पत्ताच नाही. अशा उमेदवारांनी सेंटरवर जायचं तरी कसं ? याल जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरोग्य भर्ती परीक्षा नीट नसेल होत तर राजीनामा द्या किंवा ते बोगस पोर्टल बंद करा. अशी मागणी केली जात आहे. नाहीतर सर्व परीक्षा MPSC ला आयोजित करायला सांगा अशी मागणी पीडीत परीक्षार्थीनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: