Home /News /maharashtra /

जळगावात NCP चा शिवसेनेला झटका, माजी आमदार कैलास पाटलांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

जळगावात NCP चा शिवसेनेला झटका, माजी आमदार कैलास पाटलांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

big jolt to shiv sena: जळगावात शिवसेनेला एक जोरदार झटका बसला आहे. शिवसेनेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

जळगाव, 25 सप्टेंबर : कालच भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश (BJP corporators join Shiv Sena) केला. हे सर्वच्या सर्व नगरसेवक हे एकनाथ खडसे (Eknath Khadse) गटाचे होते. शिवसेनेने या नगरसेवकांना आपल्या गळाला लावल्यानंतर आता राष्ट्रवादीने शिवसेनेला एक जोरदार झटका दिला आहे. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील (Shiv Sena former MLA Kailas Patil) यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालक आणि शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी शिवसेनेच्या इतरही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार आघाडीतील पक्षाच्या पदाधिकारी यांनी आघाडी धर्माचे पालन करावे असे ठरले असतांना बोदवड मुक्ताईनगर येथील नगरसेवकांना शिवसेनेने प्रवेश देत हा नियम मोडला. त्यामुळे आता खडसेंच्या निकटवर्ती यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. काल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे समर्थक भाजपच्या 11 नगरसेवकांनी शुक्रवारी (24 सप्टेंबर 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील सुद्धा यावेळी उपस्थितीत होते. उद्धव ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधून प्रवेश दिला. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकाचे भाजप नगरसेवक हातावर शिवबंधन बांधले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर अनेक भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. पण, खडसेंचे समर्थक असलेले नगरसेवकच आता शिवसेनेत दाखल होत असल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच जळगावमध्ये शिवसेनेनं भाजपला मोठा दणका दिला होता. जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक सेनेत खेचून आणले होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या विरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी आहेत. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Jalgaon, NCP, Shiv sena

पुढील बातम्या