मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Latur: उदगीरमध्ये MIM ला मोठं खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

Latur: उदगीरमध्ये MIM ला मोठं खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

MIM ला मोठं खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

MIM ला मोठं खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

Big jolt to AIMIM: एमआयएम पक्षाला मोठा झटका बसला आहे.

    मुंबई, 14 ऑक्टोबर : लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेची (Udgir Municipal Council) निवडणूक जवळ आली असताना राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. नगरपालिकेतील पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीने आपल्या गळाला (Udgir nagarpalika MIM corporators join NCP) लावले आहे. इतकेच नाही तर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने खेळलेल्या या खेळीमुळे एमआयएमला (MIM) एक मोठा झटका बसला आहे.

    उदगीर नगरपालिकेत एमआयएमचे एकूण सात नगरसेवक आहेत. या सात नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आहे. यासोबतच एमआयएमचे जिल्हाध्यक्षांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

    काही महिन्यात उदगीर नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदगीरमध्ये राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. लातूर जिल्ह्यात एमआयएमला पाठबळ देणारे शहर म्हणून उदगीर ओळखले जाते. येथील नगरपालिकेत सात नगरसेवक हे निवडून आले होते आणि त्यापैकी पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता आगामी निवडणुकीत याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा फायदा होतो हे पहावं लागेल.

    सध्यस्थितीत उदगीर नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 44 इतकी आहे. यापैकी भाजपचे 23 सदस्य, काँग्रेसचे 14 एमआयएमचे 7 सदस्य होते. राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी खेळी खेळून एमआयएमचे पाच नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत.

    जळगावात शिवसेनेला दुहेरी धक्का

    जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची योजना हाणून पाडत काँग्रेसनं वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेतून नगरसेवकांच्या गळतीलाही सुरुवात झाली आहे. सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस या प्रयत्नांत समाधानी नसल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत होतं. अखेर काँग्रेसनं जळगावातील सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून पत्रकार परिषद घेत आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे.

    शिवसेनेला जळगावमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे जळगावातील सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. तर दुसरीकडं इतर पक्षातून शिवसेनेत आलेले नगरसेवक स्वगृही परतत आहेत. भाजपातून आलेले 10 नगरसेवक पुन्हा मूळ पक्षात जात असून 3 नगरसेवक शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत.

    काँग्रेस का पडली बाहेर?

    सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढण्याची योजना सफल होण्याची शक्यता दिसत असतानाच काँग्रेसनं बाहेर पडत बंडाचं निशाण उगारलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची कल्पना चांगली होती. मात्र असं करत असताना सर्वांना समान अधिकार मिळण्याची गरज आहे. सर्व निर्णय एकतर्फी होणार असतील, तर आम्हाला अशा आघाडीत रस नसल्याचं सांगत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

    First published:
    top videos

      Tags: Latur, MIM, NCP