मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपला मोठं खिंडार! जळगाव मनपातील आणखी 3 नगरसेवकांच्या हाती शिवबंधन; 57 पैकी 30 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

भाजपला मोठं खिंडार! जळगाव मनपातील आणखी 3 नगरसेवकांच्या हाती शिवबंधन; 57 पैकी 30 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

BJP corporators join Shiv Sena: जळगावमध्ये भाजपला लागलेली गळती सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

BJP corporators join Shiv Sena: जळगावमध्ये भाजपला लागलेली गळती सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

BJP corporators join Shiv Sena: जळगावमध्ये भाजपला लागलेली गळती सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबई, 29 मे: शिवसेनेने (Shiv Sena) भारतीय जनता पक्षाला (BJP) एक मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेतील 5 भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश (3 corporators join Shiv Sena) केला होता. त्यानंतर आता आणखी तीन नगरसेवकांनी आपल्या हाती शिवबंधन बांधलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी या भाजपच्या नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहे.

जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे एकूण 57 नगरसेवक होते. त्यापैकी एकूण 30 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप सत्ता गमावणार

57 नगरसेवकांसह भाजपकडे बहुमत होते. मात्र, आता 30 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आणखी 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास भाजपकडे आता केवळ 16 नगरसेवक शिल्लक राहतील.

भाजपला मोठं खिंडार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7 नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

दोन दिवसांपूर्वी जळगाव मनपातील एकूण सात नगरसेवकांनी गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होत शिवसेनेत प्रवेश केला.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची नावे

पियूष महाजन

मुकेश वानखेडे

संतोष कोळी

शबाना अब्दूल अरिफ

नुसरत मेहबूब खान

बिल्कीज अमानउल्ला खान

First published:

Tags: BJP, Jalgaon, Shiv sena