Cabinet Reshuffle: प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका; जिल्हा परिषद सदस्यांसह एकूण 36 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Pritam Munde sideline from Cabinet many BJP office bearers resign: खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याचा मोठा फटका भाजपला बसत असल्याचं दिसत आहे.

Pritam Munde sideline from Cabinet many BJP office bearers resign: खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याचा मोठा फटका भाजपला बसत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:
बीड, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे (Narayan Rane), कपिल पाटील (Kapil Patil), भारती पवार (Bharti Pawar) आणि भागवत कराड (Bhagwat Karad) या चौघांना स्थान देण्यात आले. मात्र, खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नाही. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने बीड भाजपमध्ये राजीनामा (resignation) सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपच्या 11 तालुका अध्यक्षांनंतर आता जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनीही राजीनामा दिला आहे. बीडमध्ये भाजपला हादरे सुरूच, प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे आज 14 जणांचे राजीनामे! आत्तापर्यंत 36 पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनामा सत्रांमुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी आहे. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे समर्थकांमध्ये संतापची लाट आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक राजीनामा देत असताना पंकजा मुंडे यांचे मौन आहे. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे. खासदार डॉ प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट आहे. भाजप मुंडे कुटुंबाला जाणीवपूर्वक टाळत असल्याचा कार्यकर्त्यात नाराजीचा सूर आहे. बीड भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
Published by:Sunil Desale
First published: