मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी: NCPच्या ताब्यात असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश

मोठी बातमी: NCPच्या ताब्यात असलेल्या सेलू नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश

Parbhani selu jintur nagar parishad corporators join congress from ncp: काँग्रेस पक्षाने एक मोठी खेळली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू या नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना काँग्रेसने आपल्या गळाला लावले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 13 फेब्रुवारी : आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना मोठा वेग येताना दिसत आहे. इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मालेगाव महानगरपालिकेतील (Malegaon Municipal Corporation) तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला (Congress) रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. त्याचाच वचपा आज काँग्रेस पक्षाने काढल्याचं पहायला मिळत आहे. आज काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांना आपल्या गळाला लावत पक्षात प्रवेश दिला. (20 Corporators join Congress from NCP)

परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू या नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह 20 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यासोबतच मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद, नांदेड येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसचा झेंडा आपल्या हाती घेतला.

मुंबईतील टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. आगामी मनपा निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले असून फोडोफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ही मोठी उलथापालथ असल्याचं मानलं जात आहे.

वाचा : शिवसेनेची तारीख आणि वेळ ठरली; सोमय्यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार, गौप्यस्फोट करणार?

मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी वाद आता पेटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावात काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता त्याचाच वचपा काँग्रेसने काढला आहे.

27 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाला एक मोठं भगदाड पडलं. मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सर्वच्या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

वाचा : "तुमच्या राज्यात जगायची मला इच्छा नाही, माझा निरोप सरकारपर्यंत पोहोचवा", अण्णा हजारे आक्रमक

मालेगाव मनपातील स्थिती काय?

मालेगाव महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ 29 वरुन 27 इतके झाले. पण आता हे सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ 47 वर पोहोचले आहे. त्यामुळे 84 जागांच्या सभागृहात राष्ट्रवादीला आता स्पष्ट बहुमत झालं आहे.

मालेगावात शिवसेना आणि काँग्रेसची युती होती. काँग्रेस पक्षाचा महापौर होता तर शिवसेनेचा उपमहापौर होता. पण आता काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या हाती घड्याळ बांधल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Mumbai, NCP, काँग्रेस, महाराष्ट्र