मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kirit Somaiya: सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Kirit Somaiya: सोमय्या पिता-पुत्रांना मोठा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे आता अडचणीत सापडताना दिसत आहेत. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सोमय्या पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे आता अडचणीत सापडताना दिसत आहेत. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सोमय्या पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे आता अडचणीत सापडताना दिसत आहेत. कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सोमय्या पिता-पुत्रावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

मुंबई, 11 एप्रिल : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) हे आता अडचणीत येताना दिसत आहेत. किरीट सोमय्यांनी INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौकेचा निधी लाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात माजी सैनिकाने तक्रार देखील केली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि निल सोमय्या (Niel Somaiya) या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार आहे.

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्या सुनावणीवर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. 11 हजार रुपयांचा जमवलेला निधी जमा केला नसल्याचं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलं आहे आणि त्यावरुन कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आम्ही आता हायकोर्टात दाद मागणार आहोत अशी माहिती किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी दिली आहे.

वाचा : सोमय्या पिता-पूत्र पळून तर गेले नाहीत? संजय राऊतांचा खोचक सवाल

काय आहे प्रकरण?

किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होतो. यासाठी त्यांनी पैसे जमा केले होते. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.  किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज केला आहे.  INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. 2013 मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आळा आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे.

भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा 60 कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 60 कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली.

First published:
top videos

    Tags: BJP, Kirit Somaiya