मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काँग्रेसला भगदाड! मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

काँग्रेसला भगदाड! मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असले तरी तिन्ही पक्षांतील नेते स्थानिक पातळीवर आपआपल्या पक्षाची ताकद वाढवत इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्या गळाला लावताना दिसत आहेत. (Malegaon Mayor and 27 corporators of Congress join NCP)

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असले तरी तिन्ही पक्षांतील नेते स्थानिक पातळीवर आपआपल्या पक्षाची ताकद वाढवत इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्या गळाला लावताना दिसत आहेत. (Malegaon Mayor and 27 corporators of Congress join NCP)

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असले तरी तिन्ही पक्षांतील नेते स्थानिक पातळीवर आपआपल्या पक्षाची ताकद वाढवत इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्या गळाला लावताना दिसत आहेत. (Malegaon Mayor and 27 corporators of Congress join NCP)

पुढे वाचा ...

विनोद राठोड, प्रतिनिधी

मुंबई, 27 जानेवारी : काँग्रेस पक्षाला एक मोठं भगदाड पडलं आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सर्वच्या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वच्या सर्व काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा झटका आहे. (Malegaon Mayor including 27 Congress corporators join NCP)

मालेगाव मनपातील स्थिती काय?

मालेगाव महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने काँग्रेसचे संख्याबळ 29 वरुन 27 इतके झाले. पण आता हे सर्वच्या सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ 47 वर पोहोचले आहे. त्यामुळे 84 जागांच्या सभागृहात राष्ट्रवादीला आता स्पष्ट बहुमत झालं आहे.

मालेगावात शिवसेना आणि काँग्रेसची युती होती. काँग्रेस पक्षाचा महापौर होता तर शिवसेनेचा उपमहापौर होता. पण आता काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या हाती घड्याळ बांधल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसत आहे.

मालेगाव पालिकेतील सध्याचं बलाबल

काँग्रेस 29

राष्ट्रवादी 20

शिवसेना 13

भाजप 9

एमआयएम 7

जनता दल 6

एकूण जागा 84

या प्रवेशानंतर मालेगाव पालिकेतील बदलणारं बलाबल

काँग्रेस 2 (ते ही दिवंगत झाल्यानं शून्य जागा)

राष्ट्रवादी 47 (स्पष्ट बहुमत)

शिवसेना 13 (उपमहापौरपद कायम)

भाजप 9

एमआयएम 7

जनता दल 6

एकूण जागा 84

वाचा : सांगलीत भाजपचा लवकरच 'करेक्ट कार्यक्रम', 2 माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

काँग्रेसचा भाजपसोबत घरोबा

तर तिकडे बीड जिल्ह्यातील केज नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसचा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र आले असून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्ह्य अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयातीमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी शिवनेरी बंगला येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले होतं.

केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु, यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. परंतु, यावर आता पडदा पडला असून केजच्या विकासासाठी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन केली आहे.

First published:
top videos

    Tags: Malegaon, NCP, काँग्रेस