Home /News /maharashtra /

Navi Mumbai: नवी मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, 9 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

Navi Mumbai: नवी मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, 9 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

Navi Mumbai News: येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
    नवी मुंबई, 16 फेब्रुवारी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका (Navi Mumbai Municipal Corporation Election 2022) तोंडावर आलेल्या असताना एक मोठी घडामोड होताना दिसत आहे. नवी मुंबईत मनपातील भाजपचे तब्बल 9 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (BJP Corporators likely to join NCP) करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच हे नऊ नगरसेवक भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार असल्याचं कळतंय. नवी मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. (Big jolt for BJP as 9 corporators likely to join NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गणेश नाईक यांनी 2019 मध्ये भाजपत प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत नवी मुंबईतील आजी-माजी नगरसेवकांनी तसेच नाईकांच्या समर्थकांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला होता. पण आता याच गणेश नाईक यांना राष्ट्रवादीकडून मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. कारण, गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक रवींद्र इथापे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वे शरद पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप नेते रवींद्र इथापे हे आपल्यासोबत भाजपच्या 9 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवी मुंबईत हा राष्ट्रवादीचा गड होता. पण राष्ट्रवादीत असलेले स्थानिक नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपत प्रवेश केला आणि नवी मुंबईत राष्ट्रवादीला गळती लागली. त्यानंतर आता आगामी नवी मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणी करत खास रणनिती आखली. त्याचा एक भाग म्हणून आता भाजपमधील 9 नगरसेवक हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. वाचा : राज ठाकरेंनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, त्या बॅनरबद्दल खडसावले सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईत होते. त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा नवी मुंबईत उपस्थित होते. त्यावेळी भाजप नेते रवींद्र इथापे यांनी शरद पवारांची भेट घेतली. नवी मुंबई मनपा निवडणूक मविआ एकत्रित लढणार? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नवी मुंबईतील स्थानिक पातळीवरील नेत्यांची डिसेंबर महिन्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत आगामी नवी मुंबई मनपा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. वाचा : नवाब मलिक हाजीर हो! सचिन वाझेने अर्ज केल्यामुळे होणार चौकशी काय असेल जागा वाटपाचा फॉर्म्युला? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक डिसेंबर महिन्यात पार पडली होती. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र निडवणूक लढणार असल्याचं या बैठकीत ठरलं. नवी मुंबईत सध्याच्या जागा 111 आहेत. या निवडणुकीत आणखी 10 जागांची भर पडणार आहे. त्यामुळे 121 ते 122 जागा होतील असा अंदाज आहेत. यापैकी शिवसेना 75 ते 80 जागा, राष्ट्रवादी 20 ते 25 जागा आणि काँग्रेस 18 ते 22 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Ganesh naik, NCP, Sharad pawar

    पुढील बातम्या