हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप, काँग्रेसच्या मंत्र्याने वर्तवलं भाकित

हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप, काँग्रेसच्या मंत्र्याने वर्तवलं भाकित

सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होण्याचा इतिहास आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहे.  नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय भूकंप होण्याचा इतिहास आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे, असं भाकित राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी वर्तवलं आहे.

महाविकासआघाडी सरकारने पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. यापार्श्वभूमीवर न्यूज18 लोकमतशी बोलत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री  नितीन राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

मागील काही वर्षामध्ये राज्यामध्ये ओबीसींची अनेकं आंदोलन झाली. ओबीसीचे अनेक प्रश्न मांडण्यात आले. पण त्यांना फडणवीस सरकारने न्याय दिला नाही. विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी टार्गेट केलं. त्यांना तिकीटं देण्यात आली नाही. एवढंच नाहीतर त्यांना पराभूतही करण्यात आलं. त्यामुळेच आज खदखद बाहेर पडत आहे, असा दावा राऊत यांनी केला.

तसंच, भाजपापासून बहुजन समाजाच्या नेत्यांचा उत्साह कमी झाला आहे. कुठे तरी आज खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही राऊत म्हणाले.

एकनाथ खडसे पक्ष सोडत आहे का? असा सवाल विचारला असता, मी असं काहीही म्हटलो नाही. पण कोण पक्ष सोडतो कोण सोडत नाही, हे लवकरच कळणार आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, 'विरोधकांचं कामच टीका करण्याचं काम आहे. चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. विदर्भात महाविकासआघाडीचं पहिलं अधिवेशन होणार आहे. आजपर्यंत विदर्भाच्या प्रश्नावर भाजपने जी कामं केली नाही त्याची चर्चा होईल. विदर्भाच्या विकासाबद्दल नवी चर्चा होईल. त्याबद्दल आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत.' असंही राऊत  म्हणाले.

अनेक नेते संपर्कात, नवाब मलिक यांनी दिले संकेत

दरम्यान, विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये खदखद आहे. पक्षावर दिग्गज नेते नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. जे नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले ते आमदारदेखील आमच्या संपर्कात असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

माझा भरोस नाही, खडसेंनी केलं जाहीर

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या 'खास' मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला. एवढेच नाही तर पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2019, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading