मोठा निर्णय! दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाहीच!

मोठा निर्णय! दहावी आणि बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये नाहीच!

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर: दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ऑक्टोबर महिन्यात न घेण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी माहिती दिली.

हेही वाचा...शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर...आदित्यंवर अत्यंत खोचक टीका

शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, फेब्रुवारी- मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थीची फेरपरीक्षा ही बहुतेक वेळा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाते. पण, यंदा कोरोनाचं संकट असल्यानं ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कदाचित ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्या घेण्यात येण्याची शक्यता आहे.

दहावीमध्ये जवळपास एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र, नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

यंदाही मारली मुलींनीच बाजी! 

राज्याचा दहावीचा गेल्या जुलै महिन्यात जाहीर झाला होता. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला.

हेही वाचा...धारदार शस्त्रानं पतीनंच केला पत्नी आणि मुलीचा खून, समोर आलं धक्कादायक कारण...

बारावी परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: September 2, 2020, 4:43 PM IST

ताज्या बातम्या