मुंबई, 22 जून : महाविकास आघाडी सरकारने (mahavikas aghadi sarakr) मोठा निर्णय घेतला आहे. नियमितपणे कर्ज (crop loan) भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा (farmers) 50 हजारपर्यंत अनुदान दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. 1 जुलैला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शुभारंभ होणार असल्याचेही कॅबीनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंतचे अनुदान (farmers 50 thousand fund) देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (minister ajit pawar) यांनी घोषणा केली. महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना हा निर्णय घेतला असल्याने असंख्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संगणकीय प्रणाली पुर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी लवकरच पूर्ण होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार आहेत. नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असल्याने पुढच्या दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मंत्री आदित्य ठाकरेही कॅबिनेट बैठकीला गैरहजर; शिवसेनेचे होते फक्त तीनच मंत्री
महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केलंय, यामध्ये काही अपक्ष आमदारही आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचबरोबर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध जर करता नाही आले तर सरकार कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे महाविकास आघाडीत अर्थसंकल्पीय बाबी पूर्ण करण्यासाठी कॅबीनेट बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा : bhagat sinh koshyari : एकनाथ शिंदेंच्या मिशन लोट्सला लागणार ब्रेक, राज्यपाल हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोनाची लागण
४१ हजार ५५ कोटी रुपये कर्जाचे वाटप
डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमुळे पीक कर्ज वाटपात वाढ झाली असून फेब्रुवारी अखेर ४१ हजार ५५ कोटी रुपये कर्जाचे वाटप झाले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षांत ९११ कोटी रुपयांचा उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सुमारे ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगतानाच पवार यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Balasaheb thorat, NCP, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)