राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य गरीब माणसाचं घराचं स्वप्न पूर्ण होणार...

  • Share this:

मुंबई, 31 जुलै: सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा...दारुच्या दुकानात कोरोना येत नाही, सरकारचं 'नवं सायन्स'; भाजप नेत्याची खोचक टीका

एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण

मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला .रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल व योजना गतीने पूर्ण होईल. तब्बल पाच वर्षानंतर आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ही बैठक झाली.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले,झोपडपट्टी पुनर्वसनाच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यामध्ये जे काही बदल करणे गरजेचे आहे ते लवकरात लवकर केले जातील. तसेच स्ट्रेस फंड उभारण्याबाबत आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणला जाईल.

हेही वाचा...देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, ठाकरे सरकारने बंद केली महत्त्वाची योजना

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ,मुंबई महानगर वगळता उर्वरित मुंबई महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि महानगरपालिका साठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण उभारण्यात यावे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना विकासकाला सवलती जरूर दिल्या पाहिजेत परंतु त्यांनी कालमर्यादेत काम करण्याचे बंधनही त्यांच्यावर घातले पाहिजे असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी सांगितले.

Published by: Sandip Parolekar
First published: July 31, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading