Home /News /maharashtra /

पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाबाबत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाबाबत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

    मुंबई, 17 जानेवारी : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. उदय सामंत म्हणाले की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेश घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी EWS मूळ प्रमाणपत्र, NCL मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ही मुदतवाढ अंतिम असून या नंतर कोणत्याही स्वरूपाची मुदत वाढवून देण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी. '...तर प्रवेश रद्द होणार'  'पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी दिनांक 20 जानेवारीपर्यंत स्वत:च्या लॉगइनमधून ऑनलाईन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावी. जे उमेदवार मूळ प्रमाणपत्र दिनांक 20 जानेवारी सायंकाळी 05 वाजेपर्यंत सादर करणार नाही, अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसऱ्या फेरीकरीता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी,' असा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे.          'ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच पुढील सुधारीत वेळापत्रक सोमवार दिनांक 18 जानेवारीनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,' असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या