ठाणे, 27 जानेवारी : भिवंडीमधून मोठी बातमी समोर येत आहे. भिवंडीतील एक दोन मजली जुनी इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी आडकलं आहे का? याचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आज पहाटेच्या सुमारास ही इमारत कोसळल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.
एकाचा मृत्यू
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी शहरातील मुलचंद कंपाऊंडमध्ये असलेली एक जुनी जी प्लस टू इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. माजिद अन्सारी वय 25 वर्षं असं या तरुणाचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलं आहे का? याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane