Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंसाठी जीव ओवाळणाऱ्या शिवसैनिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण, एकनाथ शिंदेंनी पाळला शब्द!

उद्धव ठाकरेंसाठी जीव ओवाळणाऱ्या शिवसैनिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण, एकनाथ शिंदेंनी पाळला शब्द!

उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं निधन झालं होतं.

उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं निधन झालं होतं.

उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं निधन झालं होतं.

मुंबई, 23 जानेवारी :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर (sumant ruikar) यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे.  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पुढाकार घेऊन शिवसैनिकाला घर बांधून दिलं आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सुमंत  रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमिपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसंच त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 26 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील रायचूर येथे उपचारादरम्यान त्यांचा दुःखद निधन झालं होतं. त्यांच्या पश्चात त्यांचे संपूर्ण कुटुंब निराधार झाले होते. शिवसेनेकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पाठवली होती. (विक्रमवीर Sea Rower चा अखेर समुद्रातच मृत्यू, 75 व्या वर्षी घेतलं होतं Challenge) तसंच, ही मदत दिल्यावर फोन करून त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, त्यानंतर आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. आज रुईकर यांच्या नवीन घराचं भूमिपूजन बीड येथे पार पडलं. 'रुईकर यांचा मृत्यूची बातमी ही सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी होती. या एका कट्टर शिवसैनिकाचा असा करूण अंत झाल्याचे पाहून माझे मन हेलावून गेले होते. मात्र, अशा या अवघड परिस्थितीत या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने मी घेतला. तसंच, बीडमधील शिवसेना कार्यकर्त्यांना निर्देश देऊन हे घर लवकरात लवकर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी या घराचे भूमिपूजन होत असल्याचा विशेष आनंद होत आहे,' असं शिंदे यांनी सांगितलं. (10th Passed Jobs: उमेदवारांनो, ही संधी सोडू नका; Mahatransco चंद्रपूर इथे भरती) 'सुमंत यांनी हे घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांच्या संकल्पनेनुसार बांधून पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरेल, असंही त्यांनी सांगितलं. सुमंत रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी मंत्री शिंदे यांचे आभार मानले. पती गेल्यानंतर शिवसेनेने आपल्याला खंबीरपणे आधार दिला असून पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी केलेल्या मदतीबद्दल आपण पूर्ण समाधानी आहोत. 'आज माझे पती हयात नसले तरीही त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विशेष आनंद आम्हा रुईकर कुटुंबीयांना आहे. हे घर बांधून पूर्ण झाल्यानंतर गृहप्रवेश करताना शिंदे साहेबानी नक्की बीडला यावे, असं निमंत्रण त्यांनी शिंदे यांना दिलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या