भुजबळांचा 'जबरा फॅन', तब्बल दोन वर्ष 'त्या'ने दाढी-कटिंग केली नाही !

भुजबळांचा 'जबरा फॅन', तब्बल दोन वर्ष 'त्या'ने दाढी-कटिंग केली नाही !

त्याच्या या प्रतिज्ञेमुळे लोकांनी त्याची खिल्ली उडवली, त्याला वेड्यात काढलं. छगन भुजबळ काही जेलबाहेर येणार नाही तुला कटिंग दाढी आयुष्यभर ठेवावी लागेल असं लोकं त्याला म्हणत होती.

  • Share this:

उस्मानाबाद, 05 मे : सेलिब्रिटींच्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण आपल्या लाडक्या नेत्यासाठी काहीही करण्याची तयारी राखणारे समर्थक बोटावर मोजणारे इतकेचा असतात. असाच एक 'जबरा फॅन' आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा...या 'जबरा फॅन'चं नाव आहे बिभिषण राजाभाऊ माळी...

14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळ यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक झाली. भुजबळांना अटक झाल्यामुळे राष्ट्रवादीसह भुजबळ समर्थकांना मोठा हादरा होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील मोहा गावात राहणाऱ्या बिभिषण माळीला भुजबळांच्या अटकेमुळे धक्का बसला. त्याने एक प्रतिज्ञा केली की, जोपर्यंत छगन भुजबळ जेलबाहेर येत नाही तोपर्यंत दाढी आणि कटिंग करणार नाही. तब्बल दोन वर्ष बिभिषणने आपली प्रतिज्ञा मोडली नाही.

त्याच्या या प्रतिज्ञेमुळे लोकांनी त्याची खिल्ली उडवली, त्याला वेड्यात काढलं. छगन भुजबळ काही जेलबाहेर येणार नाही तुला कटिंग दाढी आयुष्यभर ठेवावी लागेल असं लोकं त्याला म्हणत होती. पण बिभिषण मागे हटला नाही तो आपल्या निर्णयावर ठाम होता.

अखेर शुक्रवारी 4 मे रोजी छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. अनेक लोकांनी त्याला फोन करून 'तुझ्या साहेबांना जामीन मिळाला' असं सांगितलं. ही बातमी कळताच बिभिषणच्या आनंदाचा पारावारा उरला नाही. त्याने दोन वर्ष केलेली प्रतिज्ञा अखेर पूर्ण झाली. सोमवारी भुजबळ जेलबाहेर येणार आहे.

"भुजबळ साहेबांना जामीन मिळाला, आता ते जेलबाहेर येणार हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. लोकांना मला काही म्हटलं याचं मला काहीच वाटतं नाही. आता साहेब जेलबाहेर येतील माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली. साहेबांची भेट व्हावी एवढीच इच्छा बिभिषणने news18lokmat.com कडे बोलून दाखवली.

First published: May 5, 2018, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading