महाराष्ट्राचा महासंग्राम : भोकरमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्राचा महासंग्राम : भोकरमध्ये अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ही निवडणूकही त्यांच्यासाठी कसोटीची आहे.

  • Share this:

नांदेड, 19 सप्टेंबर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भोकरमधून स्वत: उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे बापूसाहेब गोरठेकर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ते आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात अशोक चव्हाण यांचा पराभव झाला.त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अशोक चव्हाण यांना भोकरमध्येच गुंतवून ठेवण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. भोकर मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पुढाऱ्यांनी पक्षाला रामराम करत खासदार प्रताप पाटील यांची गळाभेट घेतली.

भोकर हा मतदारसंघ काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. 2009 साली झालेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मतं घेऊन विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. यावेळी त्या विजयी झाल्या पण त्यांचं मताधिक्य 20 हजाराने घटलं होतं. या दरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते.

'अयोध्येबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अमलबजावणी करू'- योगी आदित्यनाथ

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची विधानसभेत पुनरावृती होईल अशी आशा भाजपाला आहे. तर साखर कारखान्याच्या बळावर आणि वैयक्तिक अशोक चव्हाण यांच्याप्रती असलेल्या प्रेमावर काँग्रेसची भिस्त अवंलबून आहे.

Loading...

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.

2014 विधानसभा निवडणूक निकाल

अमिता चव्हाण, काँग्रेस १००७८१

माधवराव किन्हाळकर, भाजप ५३२२४

==============================================================================

VIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...