मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Pune Crime : कोल्हापूरच्या बोगस अधिकाऱ्याने नोकरीचे अमिष दाखवत पुण्याच्या तरूणांना लाखोंना घातला गंडा

Kolhapur Pune Crime : कोल्हापूरच्या बोगस अधिकाऱ्याने नोकरीचे अमिष दाखवत पुण्याच्या तरूणांना लाखोंना घातला गंडा

 मंत्रालयातील एका तोतया अधिकाऱ्याने पुण्यातील अनेक नागरिकांना नोकरीचे अमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातला आहे. (Kolhapur Pune Crime)

मंत्रालयातील एका तोतया अधिकाऱ्याने पुण्यातील अनेक नागरिकांना नोकरीचे अमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातला आहे. (Kolhapur Pune Crime)

मंत्रालयातील एका तोतया अधिकाऱ्याने पुण्यातील अनेक नागरिकांना नोकरीचे अमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातला आहे. (Kolhapur Pune Crime)

 पुणे; 20 ऑगस्ट : मंत्रालयातील एका तोतया अधिकाऱ्याने पुण्यातील अनेक नागरिकांना नोकरीचे अमिष दाखवत लाखो रुपयांना गंडा घातला आहे. (Kolhapur Pune Crime) हिम्मतराव बाळासाहेब निंबाळकर (रा. पेठ वडगाव) जिल्हा कोल्हापूर असे मंत्रालयातील तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. या तोतया अधिकाऱ्यांना कित्येकांना नोकरीच्या अमिषाने लाखो रुपये उकळले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्याच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत बऱ्यांचजणांनी या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक युवकांना मंत्रालयात आणि राज्यातील विविध शासकीय कार्यालयात नोकरी लावतो अशी भुलतापा मारत निंबाळकरने लावला तरुण आणि तरुणींना लाखो रुपयांना चुना लावला आहे. दरम्यन फसवणूक प्रकरणी हिम्मत बाळासाहेब निंबाळकर या तोतया अधिकाऱ्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोतया अधिकारी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे.

हे ही वाचा : Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis : फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? उद्धव ठाकरेंचा रोखठोक

पुणे मनपा, मुंबई मनपा आणि मंत्रालयातील विविध शासकीय पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवत आरोपी हिम्मतराव निंबाळकर तरुणांना मंत्रालयात बोलवून घेवून फसवणूक करत होता. दरम्यान निंबाळकरच्या पाठीमागे कोणाचा हात आहे का अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्थानकात 6 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी निंबाळकर हा गळ्यामध्ये महाराष्ट्र शासन लोगो असलेली आयडी लावून मंत्रालयातील अधिकारी असल्याचे भासून नागरिकांची फसवणूक करत होता. दरम्यान तो लोकांना मोठे मोठे आश्वासन देऊन त्यांच्याशी गोड बोलून पैसे उकळायचा. बेरोजगारीमुळे काही शिकलेले तरूणही त्याच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

 हे ही वाचा : 'इतर राज्याप्रमाणे आर्थिक मदत करा', राष्ट्रकुल पदकविजेत्या अविनाश साबळेंच्या आई-वडिलांची सरकारकडं मागणी

राज्यभरात शेकडो तरुण-तरुणींची निंबाळकरने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर निंबाळकरने ज्यांची फसवणूक केली आहे अशा नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

First published:

Tags: Job, Kolhapur, Money fraud, Mumbai, Pune (City/Town/Village)

पुढील बातम्या