लग्नकार्यात पैशावरून झाला राडा, तरुणाला बेदम मारहाण करून लुटले

लग्नकार्यात पैशावरून झाला राडा, तरुणाला बेदम मारहाण करून लुटले

लग्नकार्यात तरुणाला लाकडी दांडक्याने डोके आणि पाठीवर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी, 24 जानेवारी : लग्न कार्यात गेलेल्या तरुणाला चौघांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसंच गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना अंसारी शादी हॉल, खंडू पाडा येथे काल रात्री घडली आहे. शाकिब बन्नेसरदार मन्सुरी ( 19 रा. पांजरापोळ रोड ) असे मारहाण करून लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

भिवंडीतील शाकिब मन्सुरी हा तरुण मित्रांसोबत खंडूपाडा येथे गेला होता. त्यावेळी मित्र खलील याने 100 रुपये मागितल्याने ते देण्यासाठी शाकिबने 20 हजार रुपये काढले. त्याचा राग मेहताब व मेहबूब सिद्दीकी ( रा.पटेलनगर ) यांना आल्याने या दोघा भावांनी त्यांच्या अन्य दोन साथीदारांसह संगनमत करून शाकिब यास पकडून हाताच्या ठोश्याबुक्यांसह लाकडी दांडक्याने डोके आणि पाठीवर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.

या मारहाणीच्या धुमश्चक्रीत शाकिब याच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची 20 हजार किंमतीची सोन्याची चैन आणि 19 हजार 900 रुपयांची रोकड तसंच 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 44 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेऊन पळ काढला आहे.

मुलीची छेड काढल्याचा राग, वडिलांनी दिवसा ढवळ्या केली तरुणाची हत्या

मारहाणीत जखमी झालेल्या शाकिब यास उपचारासाठी प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डोके आणि पाठीवरचा मार गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यास वंजारपट्टी नाका येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

या लूटमार आणि मारहाण प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात मेहताब व मेहबूब सिद्दीकी व त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात भादंवि.394 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून मेहताब यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक तुकाराम सकुंडे करीत आहे.

First published: January 24, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या