• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • खळबळजनक! क्रिकेटवरून झालेल्या वादातून थेट गोळीबार, तरुण गंभीर जखमी

खळबळजनक! क्रिकेटवरून झालेल्या वादातून थेट गोळीबार, तरुण गंभीर जखमी

क्रिकेटवरून झालेल्या वादातूनही तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे.

  • Share this:
भिवंडी, 23 जानेवारी : भिवंडीत शिवसेनेच्या शाखाध्यक्षासह एका महिलेवर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच क्रिकेटवरून झालेल्या वादातूनही तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला आहे का, याबाबतही पोलीस तपास करत आहेत .  प्रफुल्ल तांगडी असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून पायगाव येथे फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आलं होते . मात्र या क्रिकेट ग्राऊंडकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने जखमी व हल्लेखोर यांच्या गाड्या समोरासमोर आल्या असता गाड्या मागे घेण्यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. हेही वाचा - मुंबई पोलिसांची झोप उडवणाऱ्या आरोपीला अखेर अटक, भर रस्त्यातच करायचा विकृत कृत्य ''आधी तू गाडी मागे घे, आधी तू गाडी मागे घे '' अशी जोरदार बाचाबाची झाल्यांनतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले व त्यांनतर एका तरूणाने चक्क प्रफुल्ल याच्यावर रिव्हॉल्वरने पाच राउंड फायर केले. या गोळीबारात प्रफुल्ल गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीवर पोटावर व हातावर तीन गोळ्या लागल्या असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्यास उपचारासाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गोळीबार करणारा हल्लाखोर तरुण फरार झाला असून भिवंडी तालुका पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांनी दिली आहे . दरम्यान, भिवंडीत लागोपाठोपाठ गोळीबाराच्या घटना घडत असल्याने हल्लेखोरांजवळ हे अवैध रिव्हॉल्वर येतातच कुठून असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून पोलीस प्रशासन याविरोधात कठोर भूमिका का घेत नाही, असा सवाल देखील उपस्थित होत आहे. 
Published by:Akshay Shitole
First published: