Home /News /maharashtra /

धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला पेटवले, भिवंडीतील घटनेने खळबळ

धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला पेटवले, भिवंडीतील घटनेने खळबळ

Woman allegedly set on fire by husband in Bhiwandi: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत पतीने आपल्या पत्नीला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    भिवंडी, 25 सप्टेंबर : महिला अत्याचाराच्या घटनांत गेल्याकाही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. आता ठाणे जिल्ह्यातील (Thane district) भिवंडीतून (Bhiwandi) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार (Wife denied money for liquor) दिल्याने संतापलेल्या पतीने तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न (woman set on fire by husband) केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज याने आपल्या पत्नीकडे दारू खरेदीसाठी पैसे मागितले. यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुकसाना हिने तात्काळ आग विझवत घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिकारी जयमाला वसावे यांनी सांगितले की, भिवंडीतील शांतीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही कथित घटना घडल्या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फिरोज याच्या विरोधात पोलिसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. बुलडाण्यात बलात्कार पीडितेची आत्महत्या; Suicide note वाचून पोलीसही हादरले बुलडाण्यात सप्टेंबर रोजी एका तरुणीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित मुलीने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली असून ती वाचून पोलीसही हादरले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात एका 18 वर्षीय युवतीने 20 सप्टेंबरला आत्महत्या केली होती. या युवतीने नेमके कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा खुलासा झाला नव्हता. मात्र काल या युतीच्या आत्महत्येचे कारण उलगडले आहे. घरातील भगवद्गगीतेमध्ये या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या दोन जणांची नावं तिने लिहून ठेवली होती. डोंबिवलीत 29 जणांकडून 15 वर्षीय मुलीवर 9 महिने गँगरेप एका अल्पवयीन मुलीवर 29 मुलांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही 15 वर्षीय आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास मानपाडा पोलिसांत एक तक्रार दिली. तिने सांगितले की जानेवारी 2021 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड या वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या ओळखीतल्या मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानुसार रात्री मानपाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलगी 15 वर्षीय अल्पवयीन असल्याने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bhiwandi, Crime

    पुढील बातम्या