भिवंडी, 7 डिसेंबर : भिवंडीमध्ये गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भिवंडी तालुक्यातील कशेळी बस स्टॉपवर गोळीबार झाला, या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश कोकाटे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. गोळीबार झाल्यानंतर गणेश कोकाटे याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला.
गोळीबाराच्या घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढच्या तपासाला सुरूवात केली आहे. गणेश कोकाटे याच्यावर झालेला गोळीबार वैयक्तीक वादातून झाला का यामागे काही वेगळं कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.