Home /News /maharashtra /

भयंकर! ड्रायव्हर रस्त्यावर वाहनांना चिरडत सुसाट निघाला, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी

भयंकर! ड्रायव्हर रस्त्यावर वाहनांना चिरडत सुसाट निघाला, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी

टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत.

भिवंडी, 30 नोव्हेंबर : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अंबाडी रस्त्यावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने भरधाव वेगाने जात सावरोली गावाजवळ एका छोट्या टेम्पोला उडविले आणि इतर तीन वाहनांना धडक दिली. यात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 5 जण जखमी झाले आहेत. टेम्पोचालक यशवंत पाटील (45) रा. दिघाशी हे आपल्या MH 04 EL 986 या गाडीतून भाजीपाल्याची वाहतूक करण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास अंबाडीहून वज्रेश्वरी दिशेने जात होते. त्यावेळी अंबाडी दिशेला जाणाऱ्या गाडी क्र.MH 04 JK 7521 हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याने समोरून येणाऱ्या या छोट्या टेम्पोला उडवले. त्यात टेम्पोचा चक्काचूर होऊन टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले हभप यशवंत दत्तात्रय पाटील यांना पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. बेदरकार चालक वाहनांना चिरडत निघाला... सदर टेम्पोला धडक दिल्यानंतर डंपर चालकाने टेम्पोच्या मागून येणाऱ्या स्वीफ्ट आणि दुसऱ्या एका टेम्पोला आणि दुचाकीला धडक दिली. तसंच तिथून अंबाडीच्या दिशेला पलायन करत असताना झिडके फाटा येथे आणखी एका दुचाकीस्वाराला धडक दिली. तेव्हा तेथील तरुणांनी सदर चालक माधव धोंडूबा ठगे वय 50 यास पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या घटनेनंतर अंबाडी नाका येथील पोलीस चौकीमध्ये परिसरातील शेकडो तरुणांनी नागरिकांनी दाखल होत सदर चालकावर कडक कारवाईची मागणी केली आहे. तसंच खडी वाहतूक करताना सुसाट वेगात जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bhiwandi, Road accident

पुढील बातम्या