भिवंडीत अवैध रेती उपशावर महसूल विभागाची धडक कारवाई, 1 कोटी 20 लाखांचे सक्शन जप्त

भिवंडीत अवैध रेती उपशावर महसूल विभागाची धडक कारवाई, 1 कोटी 20 लाखांचे सक्शन जप्त

पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 1 कोटी 20 लाखांचे 16 सक्शन पंपासह 4 बार्ज जप्त करून नष्ट केले आहे.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी, 8 फेब्रुवारी : रेती उपसा करण्यावर बंदी असतानाही कल्याण ते कोनगाव खाडी आणि कशेळी ते सुरई खाडीत लोखंडी बार्ज आणि सक्शन पंपद्वारे अवैध रेती उपसा सुरू आहे. याबाबतची माहिती भिवंडी प्रांत अधिकारी डॉ मोहन नळदकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश देत महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनासह सदर ठिकाणी छापा मारला.

पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 1 कोटी 20 लाखांचे 16 सक्शन पंपासह 4 बार्ज जप्त करून नष्ट केले आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध रेती उपसा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. भिवंडी तालुका हद्दीत असलेल्या कल्याण ते कोनगाव खाडीत तसेच कशेळी ते सुरई, सारंग खाडी येथे अवैध रेती उपसा होत असल्याची खबर महसूल अधिकाऱ्यांना मिळताच पोलिसांच्या मदतीने या दोन्ही ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण कोनगाव खाडीत कारवाई करताना 2 सक्शन पंप आणि 1 बार्ज जप्त करून 4 अज्ञात इसमांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कशेळी ते सारंग सुरई खाडीत धडक कारवाई करत 14 सक्शन पंप 3 बार्ज जप्त करण्यात आले आहे. तसंच 10 अज्ञात इसमांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाईत सुमारे 1 कोटी 20 लाखांचे 16 सक्शन पंपासह 4 बार्ज जप्त करण्यात आले असून ते नष्ट करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Feb 8, 2020 10:57 PM IST

ताज्या बातम्या