• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • दरोडा टाकण्यासाठी आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; आरोपींकडून रोकडसह शस्त्र आणि सोन्याचे दागिने जप्त

दरोडा टाकण्यासाठी आले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; आरोपींकडून रोकडसह शस्त्र आणि सोन्याचे दागिने जप्त

भिवंडीत 10 किलो गांजा, 80 ग्रॅम सोन्याचे दागिन्यां सह दरोडा टाकण्यासाठी आलेल्या आरोपी कडून रिव्हॉल्व्हर सह दोन जिवंत काडतुसे जप्त

  • Share this:
भिवंडी, 11 ऑगस्ट : दरोडा (Robbery) टाकण्यासाठी आलेल्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे (Shanti Nagar Police) हद्दीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी (Crime) कृत्य होत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत चोरट्यांकडून 80 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त (80 gram gold ornaments seized) करण्यात यश मिळविले आहे. पोलीस उप निरीक्षक रवींद्र पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत आमपाडा शानदार मार्केट येथे सोहेल शेख नामक व्यक्ती आपल्या साथीदारासह गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शानदार मार्केट येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या मोटारसायकल वरील थैलीत दोन पॅकेटमध्ये 2 लाख 7 हजार 800 रुपये किमतीचा 10 किलो 390 ग्रॅम गांजा व दुचाकी मोबाईल असा एकूण 2 लाख 57 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वह्या - पुस्तकांसोबत शाळेत न्या मास्क आणि सॅनिटायझर, आई-वडिलांनी अशी घ्यावी मुलांची काळजी टेमघर येथील गोरखनाथ अंकुश म्हात्रे यांनी सार्वजनिक रस्त्यालगत आपल्या जवळील 90 ग्रॅम वजनाचे दागिने आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दुचाकी उभी करून ठेवली असता आरोपी अनिल पाल याने सदर दुचाकी चोरी केली होती. याबाबत 2 लाख 15 हजार रुपयाच्या चोरी बाबत गुन्हा दाखल असताना पोलिसांनी तांत्रिक तपासा द्वारे माहिती मिळवून रांची रा. झारखंड येथून आरोपीस ताब्यात घेऊन 80 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. तर शांतीनगर भाजीमार्केट येथील मन्नत गोल्ड या सोने विक्रीच्या दुकानात रात्री साडेनऊ वाजताच्या चांदीची अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने आलेल्या ग्राहकाने चोरी केली होती. दुकानदार अंगठी दाखवीत असताना आपल्या जवळील रिव्हॉल्व्हर दुकानदाराच्या गळ्याला लावून त्याच्याकडील सर्व दागिने चोरीचा प्रयत्न केला या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस शिपाई श्रीकांत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस निशस्त्र करून आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून एक रिव्हॉल्व्हर दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात यश मिळविले आहे. पोलीस उपयुक्त योगेश चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पो निरीक्षक किरणकुमार काबाडी, नितीन पाटील, विक्रम मोहिते यांच्या नेतृत्वखाली पो उप निरीक्षक रवींद्र पाटील, निलेश जाधव, बडगिरे या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
Published by:Sunil Desale
First published: