भिवंडी, 1 जानेवारी : भिवंडीत बेपत्ता असलेल्या तरुणाचा सातव्या दिवशी मृतदेह आढळला आहे. खून करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घुंगटनगर येथील 25 डिसेंबर रोजी कृष्णा केसरवानी हा 28 वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. त्याची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
भंगाराच्या व्यवसायातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. खून करून चावींद्रा परिसरात या तरुणाचा मृतदेह आरोपीनेच दाखवला. त्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय आहे प्रकरण?
भिवंडी शहरातील घुंघटनगर इथं राहणारा 28 वर्षीय कृष्णा केसरवाणी तरुण 25 डिसेंबर पासून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी कृष्णा बेपत्ता झाल्याची शहर पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवली असताना चार दिवसापूर्वी पारोळ रोड वरील चिंबीपाडा इथं चायनीजच्या दुकानाशेजारी त्याची दुचाकी सापडली. त्यामुळे त्याचे कुटुंबीय भयभीत झाले आणि संपूर्ण शहरात आणि ग्रामीण भागात शोधून सुद्धा हा तरुण सापडला नाही.
त्यामुळे नुकताच घुंघटनगर येथील शेकडो नागरिकांनी अचानक पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर रस्ता रोको करीत आमचा मुलगा आणून द्या अशा घोषणा देत आंदोलन केले होते. दरम्यान आता या तरुणाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.