Home /News /maharashtra /

मंगलाष्टक गाऊन 2 हजार लग्न लावणाऱ्या महिलेने केला अनोखा रेकॉर्ड

मंगलाष्टक गाऊन 2 हजार लग्न लावणाऱ्या महिलेने केला अनोखा रेकॉर्ड

गेल्या 40 वर्षांमध्ये मंगलअष्टका गाऊन तब्बल 2 हजार पेक्षा जास्त लग्न लावून एक रेकॉर्ड केला आहे.

भिवंडी,1 फेब्रुवारी : भिवंडीतील भादवड इथं राहणारी महिला हिराबाई गुरुनाथ यांनी गेल्या 40 वर्षांमध्ये मंगलाष्टक गाऊन तब्बल 2 हजार पेक्षा जास्त लग्न लावून अनोखा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे सर्व लग्नात एकही पैसा न घेता सुशिक्षित महिला, मुलींनीसुद्धा आगरी समाजात लग्न लावण्यासाठी पुढाकार घेण्याची जनजागृती ही महिला राबवत  आहे. आगरी समाजातील लग्न सोहळ्यात नेहमी आपल्या सुरमधूर आवाजातून ही महिला लग्न लावत असून गेली 40 वर्ष मंगलाष्टक गायनाचे काम करत आहे. आतापर्यंत त्यांनी तब्बल 2 हजार पेक्षा जास्त लग्न लावली आहेत. 1 जून 1057 रोजी हिराबाई यांचा जन्म झाला असून आज त्यांचे वय 62 वर्ष आहे. त्यांना 4 मुले आहेत. त्यातील 2 मुलांना त्यांनी शिक्षक बनवले आहे. तर 1 मुलगा महानगर पालिकेत असून 1 ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. हेही वाचा - मुलाला वाचवण्यासाठी आईने घेतली धाव, पण दोघांनाही गमावावा लागला जीव हिराबाई ही सामान्य गरीब कुंटुबातील महिला आहे. आवड आणि आपल्या कलेला ग्रामीण भागात पोहचून कोणतेही मानधन न घेता हिराबाई तरे या आपला छंद घरात आणि ग्रामीण भागात जोपासत आहेत. त्यांचे शिक्षण 8 वी झाले आहे. लग्नासाठी ब्राम्हण मिळत नसल्याने त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षांपासून मंगलाष्टका त्यांच्या मामापासून शिकण्यास सुरुवात केली होती.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bhiwandi, Marriage

पुढील बातम्या