Home /News /maharashtra /

भिवंडी हादरली, बारा तासात दोन जणांची हत्या

भिवंडी हादरली, बारा तासात दोन जणांची हत्या

बारा तासात भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

भिवंडी,  07 मार्च : भिवंडीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे.  शहरातील नालापार इथं मजुराची गळा चिरून हत्या तर इदगा इथं वृद्धच्या  डोक्यावर प्रहार  करून हत्या करीत  खाडीत फेकल्याच्या वेगवेगळ्या दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. बारा तासात भोईवाडा या एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पहिल्या घटनेत नालापार इथं राहणारा तुळशीराम चव्हाण (31)याची कासमी कम्पाऊंडमध्ये अज्ञात व्यक्तीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. तुळशीराम चव्हाण हा  पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही पूर्ववैमन्यासातून हत्या झाली असावी, असं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.  या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत इदगा इथं  50 वर्षीय देवाजी जाधव याच्या डोक्यात प्रहार झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर देवाजी जाधव यांचा मृतदेह हा खाडीत आढळून आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटना बारा तासात घडल्याने खळबळ माजली आहे. मात्र, देवाजी जाधव प्रकरणी डोक्याला मार लागल्याने खाडीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलीस दोन्ही घटनांचा तपास करीत आहे. नागपूरमध्ये गजबजलेल्या चौकात तरुणावर गोळीबार दरम्यान, नागपूर उमरेड मार्गावरील दिघोरी पुलाजवळ गजबजलेल्या चौकात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इम्रान सिद्दिकी नावाच्या तरुणावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार केला. ज्यामध्ये इम्रानला दोन गोळ्या लागल्या असून त्याला गंभीररित्या जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान सिद्दिकी त्याच्या काही मित्रांसोबत उभा असताना ऍक्टिव्हा गाडीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. इम्रानला दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून बुलेटचे शेल जप्त केले आहे. प्राथमिक दृष्टया ही घटना जुन्या वैमानस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.  या प्रकरणी गुन्हे शाखेनं दोघांना एक देशी  बनावटीचे पिस्तुल आणि 8 राऊंड गोळ्यांसह अटक केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या