आईसोबत वाद झाला अन् 13 वर्षांची मुलगी थेट घर सोडून गेली, पण...

आईसोबत वाद झाला अन् 13 वर्षांची मुलगी थेट घर सोडून गेली, पण...

पोलिसांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून तिला कुटुंबाच्या ताब्यात दिले आहे.

  • Share this:

<strong>रवी शिंदे, भिवंडी, 10 फेब्रुवारी :</strong> मुंबई - नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी रडत असलेली नारपोली पोलिसांना  आढळून आली होती. या अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता सदर मुलगी घरात आईशी झालेल्या शुल्लक रागातून घरातून निघून गेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क साधून मुलीला सुखरूप वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

इशरत जहा मोहम्मद आरिफ अन्सारी ( वय 13 वर्ष रा. दिवानशहा दर्गा ) असे पोलिसांनी राडताना आढळून आलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव असून तिचे आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून तीने घरातून पळ काढत थेट मानकोली नाका गाठला. मात्र या ठिकाणी आल्यावर घरचा रस्ता विसरल्याने ती गोंधळून गेली.

घरापासून दूर गेलेली चिमुरडी भीतीने रडत बसली होती. रडत असताना तीस बीट मार्शल 3 च्या कर्मचाऱ्यांनी तिला पाहिले आणि मानकोली चौकी येथे आणले.  त्यानंतर पोलीस निरीक्षक भालेराव व बीट मार्शल 3 चे कर्मचारी तसेच मुस्कान पथक यांनी या मुलीची चौकशी केली असता ती घरातून रागात निघाल्याची माहिती मिळाली.

'जेसीबी'ने झाला युवकाचा संशयास्पद मृत्यू, मात्र खून झाल्याचा लोकांना संशय

पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता तिचे वडील अरिफ अब्दुल मोफीज अन्सारी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून सदर बाबतीत पूर्ण खात्री करण्यात आली आणि या अल्पवयीन मुलीस तिच्या वडिलांकडे सुखरूप सोपवले. आपली मुलगी सुखरूप सापडल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.

First published: February 10, 2020, 9:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या