• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ग्रामपंचायत निवडणुकीत राडा; वादानंतर रॉड आणि चॉपरने हल्ला, 4 जखमी

ग्रामपंचायत निवडणुकीत राडा; वादानंतर रॉड आणि चॉपरने हल्ला, 4 जखमी

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारीवरून वाद झाल्याने चौघांवर रॉड, चॉपरने हल्ला करण्यात आला आहे.

  • Share this:
भिवंडी, 2 जानेवारी : भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आता वाद आणि हाणामाऱ्या होण्यास सुरुवात झाली आहे, गुंदवली गावात ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारीवरून वाद झाल्याने चौघांवर रॉड, चॉपरने हल्ला करण्यात आला आहे. ग्रामपंचायत उमेदवारीवरून झालेल्या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसंच एका आरोपीने रिव्हॉल्व्हरही रोखून धरल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चौघांमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी दोन्ही गटातील 15 जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीला हिंसक वळण लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकदा जुन्या वैरातून हिंसा होत असल्याचं पाहायला मिळतं. तसंच निवडणुकीत विजय मिळवायलाच हवा, यासाठी काही उमेदवार टोकाची भूमिका घेण्यासही मागे-पुढे पाहात नाहीत. यातूनच मग निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागते. त्यामुळे निवडणूक काळात प्रत्येकाने संयम बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Published by:Akshay Shitole
First published: