Home /News /maharashtra /

Bhiwandi Double Murder: वृद्ध दाम्पत्याची घरात घुसून निर्घृण हत्या, दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरली

Bhiwandi Double Murder: वृद्ध दाम्पत्याची घरात घुसून निर्घृण हत्या, दुहेरी हत्याकांडाने भिवंडी हादरली

Double murder in Bhiwandi Thane district: ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

भिवंडी, 22 जानेवारी : मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातून (Thane district) धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात (Bhiwandi Taluka) एका वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या (elderly couple killed) करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून या दाम्पत्याची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण भिवंडीत एकच खळबळ उडाली आहे. बाळू पाटील आणि सत्यभामा पाटील अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. (Elderly couple brutally murdered in Bhiwandi Taluka of Thane District) भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी आणि अकलोली यांच्या दरम्यान असलेल्या पेंढरीपाडा गावात राहणाऱ्या पती-पत्नीची राहत्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाळू पाटीलसह त्यांच्या पत्नीची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गणेशपुरी पोलीस पथक दाखल झाले. वाचा : सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या, सेल्फी काढत उचललं टोकाचं पाऊल पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गणेशपुरी पोलीस ठाण्यात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला असून अद्याप हत्येचे कारण समजू शकले नाहीये. भिवंडीत 24 तासात दोन घटनात तीन हत्या भिवंडी तालुक्यात गेल्या 24 तासात दोन घटनेत तीन हत्या झाल्याच्या घटनेने भिवंडी चांगलीच हदरली आहे. बाळू पाटील आणि त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्याकांडावेळी घरातील टीव्ही सुरु होता. दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाचा : नागपुरात भरदिवसा महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटनेचा Shocking VIDEO आला समोर तर काल सायंकाळी भिवंडी तालुक्यातील कांबा गावच्या हद्दीतील रोडच्या किनारी झाडीत 40 वर्षीय इसमाचा हत्या करून गोणीत भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून त्याचे नाव अरमान असल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदणासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून निजामपूरा पोलीस ठाण्याचा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 24 तासात दोन घटनेत तीन हत्या झाल्याने भिवंडी चांगलीच हदरली असून हत्येचा छडा लावण्यासाठी गाणेशपुरी आणि निजामपूरा पोलिसांचा तपास युद्ध पातळीवर सुरु आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Bhiwandi, Crime, Murder, Thane

पुढील बातम्या