• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • धारदार तलवारीनं दोघांवर सपासप वार, भिवंडीतील जीवघेण्या हल्ल्याचा LIVE VIDEO

धारदार तलवारीनं दोघांवर सपासप वार, भिवंडीतील जीवघेण्या हल्ल्याचा LIVE VIDEO

दोन भावांनी भरदिवसा तलवारी घेऊन तीन जणांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर वार केले.

  • Share this:
भिवंडी, 21 नोव्हेंबर : दिवाळीनंतर पुन्हा भिवंडी तालुक्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. तालुक्यातील पडघा पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दोन भावांमध्ये खुलेआम तलवारीनं तिघांचा पाठलाग करत सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दोन भावांनी भरदिवसा तलवारी घेऊन तीन जणांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर वार केले. शुक्रवारी भिवंडी तालुक्यात घडलेल्या या घटनेत वडिलांसह दोन मुलं जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा-अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामाभाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटना या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात तलवारबाज यासिन चिखलेकर, हजर चिखलेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं मात्र काही वेळानं पुन्हा सोडून देण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी मोठा भाऊ भाजपचा कार्यकर्ता असून खैर, चंदन पुरवठा करण्याचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे मात्र पोलिसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे त्यामुळे आता ठाणे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published: