NRC आणि CAA वरून महाराष्ट्रातही राडा, नगरसेवकाने लोखंडी रॉडने तिघांवर केला हल्ला

NRC आणि CAA वरून महाराष्ट्रातही राडा, नगरसेवकाने लोखंडी रॉडने तिघांवर केला हल्ला

नगरसेवकाने त्याच्या समर्थकांसोबत एका इस्टेट एजंटसह दोघांवर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

रवी शिंदे, भिवंडी, 30 जानेवारी : एनआरसी आणि सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आक्षेप घेतला, असा संशय घेऊन स्थानिक नगरसेवकाने त्याच्या समर्थकांसोबत एका इस्टेट एजंटसह दोघांवर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीतील पिराणी पाडा येथे घडली आहे.

पोलिसांनी या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर हल्लेखोरांना अद्यापी अटक न केल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फैय्याज यासीन सैय्यद ( 47 ) आणि इकबाल असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इस्टेट एजंटची नावे आहेत.

पिराणीपाडा येथे नगरसेवक सुफियान शेख यांनी 17 जानेवारी रोजी एनआरसी आणि सीएएच्या विरोधात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी इस्टेट एजंट फैय्याज आणि इकबाल हे दोघे कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते. त्यामुळे या दोघांच्याबाबत नगरसेवक सुफियान यांच्या मनात संशय निर्माण झाल्याने त्यांनी कार्यकर्ते सलीम अंसारी, मसी अख्तर शेख आणि अरफात आदींसोबत संगनमत करून काल रात्री गणेश सोसायटी, इंद्रायणी निवास येथे फैय्याज व इकबाल या दोघांना गाठून लोखंडी रॉड व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

जे राजस्थान पोलिसांना जमलं नाही ते कोल्हापूर पोलिसांनी करून दाखवलं, Most Wanted 007 गँगचा केला खेळ खल्लास

या मारहाणीत फैय्याज याच्या उजव्या कोपराजवळ गंभीर दुखापत तर इकबाल याच्या उजव्या पायाची नरगडी फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक सुफियान शेख ,सलीम अंसारी ,मसी शेख व अरफात यांच्या विरोधात भादंवि. कलम 326 , 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय अमोल मोरे करत आहेत. 

First published: January 30, 2020, 9:08 PM IST

ताज्या बातम्या