भिवंडी दुर्घटना: तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल

भिवंडी दुर्घटना: तब्बल 10 तास ढिगाऱ्याखाली राहून त्यानं अनुभवला मृत्यूचा थरार.. Video व्हायरल

इमारत दुर्घटनेनंतर खालिद खान हा तब्बल 10 तास ढिगार्‍याखाली गाडला गेला होता.

  • Share this:

भिवंडी, 24 सप्टेंबर: भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल कंपाऊंड येथील जिलानी बिल्डिंग दुर्घटनेतील (Bhiwandi Building Collapse) मृतांचा आकडा 41 वर पोहोचला आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत एनडीआरएफच्या (NDRF) पथकानं 19 जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. यातच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका तरुणानं केलेला मोबाईल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा.."पुलवामातील जवानांपेक्षा जास्त निरागस जीव मुंबईत गेले", कंगना रणौत पुन्हा बरसली

जिलानी इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम अद्याप सुरूच आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीनं मोबाईल टॉर्चच्या मदतीनं आपण जिवंत असल्याचा इशारा दिला होता. ढिगाऱ्याखालून आवाज आल्यानं एनडीआरएफच्या जवानांनी संबंधित व्यक्तीला धीर देऊन त्याला तातडीनं सुखरूप बाहेर काढलं होतं. खालिद खान असं या तरुणाचं नाव आहे. मात्र, दुर्दैव म्हणजे या दुर्घटनेत खालिद यानं आपला भाऊ व पुतण्या गमावला आहे.

तब्बल 10 तास होता ढिगाऱ्याखाली...

या इमारत दुर्घटनेनंतर खालिद खान हा तब्बल 10 तास ढिगार्‍याखाली गाडला गेला होता. या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्यानंतर मृत्यू अटळ असताना खालिद खान यानं हिम्मत खचू दिली नाही. काही वेळानंतर खालिद शुद्धीवर आला. आपल्याला कोणी मदत करण्यासाठी येईल, याची वाट पाहत होता. तेवढ्यात  त्याला NDRFने हाक मारली व त्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. यादरम्यान त्यांनी अनेक वेळा मोबाईल फोनद्वारे अनेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तो न झाल्यानं खालिद खान याने या दुर्घटनेची विदारक वास्तव आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं खालिद खान याची तब्बल दहा तासानंतर NDRFने सुटका केली होती. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या खालिद खान याने केलेला व्हिडीओ आता आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा...महिला अत्याचाराविरोधात योगी आक्रमक, सार्वजनिक ठिकाणी लावणार आरोपींचे पोस्टर्स

बाटलीभर पाण्यावर त्यानं वाचवला जीव...

ढिगार्‍याखाली असताना खालिद खान या तरुणानं बाटलीभर पाण्यावर आपला जीव वाचवला.  शिवाय आपल्याला कोणी मदत करण्यासाठी येईल, याची वाट तो पाहत होता. तितक्यात त्याला NDRF च्या जवानांचा आवाज आला. खालिद यानं जवानांना हाक मारली. त्यानंतर त्यानं सुटकेचा श्वास घेतला. यादरम्यान त्यांनी अनेक वेळा मोबाईल फोनद्वारे अनेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय एक व्हिडिओ देखील बनवला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 5:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading