भिवंडी, 26 डिसेंबर : भिवंडी शहरातील कचेरी पाडा येथील मुला-मुलींच्या बालसुधार गृहाच्या भिंतीला टेकून असलेला टोरेट कंपनीचा विद्युत सप्लाय करणाऱ्या ट्रान्सफार्मरचा आज सायंकाळी अचानक आग लागून स्फोट झाला. स्फोटानंतर ट्रान्सफार्मरमधील ऑइल रस्त्यावर उडाले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या स्फोटाबाबतची माहिती अग्निशमन दलास मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तसंच दुर्घटनेत बालसुधारगृहातील मुला-मुलींना कोणतीही इजा अथवा हानी झाली नाही.
हेही वाचा - धक्कादायक! पत्नी आणि चार निष्पाप मुलांची धारदार शस्त्राने हत्या करून तरूणानं स्वतःलाही संपवलं
दरम्यान, भिवंडीतील कचेरी पाडा येथील बालसुधार गृहाच्या भिंतीला असलेल्या ट्रान्सफार्मचा स्फोट झाल्याने टोरेट पॉवर कंपनीने त्वरित विद्युत प्रवाह बंद केा. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग विझवली. रस्त्यावरील वाहतूक तात्काळ बंद केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.