Home /News /maharashtra /

भीषण अपघातात उद्धवस्त झाला संसार, पत्नीने अर्ध्यावरच सोडली साथ

भीषण अपघातात उद्धवस्त झाला संसार, पत्नीने अर्ध्यावरच सोडली साथ

दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    रवी शिंदे, भिवंडी, 13 फेब्रुवारी : भिवंडीतील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सुरू असलेले अपघात सत्र थांबता थांबण्याचे नाव घेत नसल्याचं दिसत आहे. पतीसोबत दुचाकीवरून नातेवाईकांकडे निघालेल्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पती जखमी झाला असून ही घटना भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत क्षेत्रात सावरापाडा येथे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे . ललिता चंद्रशेखर महंतो ( वय 40 वर्ष रा. मिठपाडा ) असे मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून खाडीपार येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाली होती. सध्या नदीनाका मिठपाडा या रस्त्याच्या बाजूला टोरेंट पावर कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू केले आहे . त्यामुळे हा रस्ता खोदल्यामुळे अरुंद झाला असल्याने रस्त्याचा अंदाज न आलेल्या टेम्पोने दुचाकीला धडक दिली. जीवघेणा ठरला नात्यातला व्यवहार, दिल्लीतील 5 जणांच्या मृतदेह प्रकरणाला धक्कादायक वळण दुचाकीला धडक लागल्यानंतर महिला खाली कोसळली. यामध्ये तिच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला असून या अपघाताची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान येथील रस्ता वीज कंपनीने खोदल्यामुळे अरुंद झाला असल्यानेच हा अपघात झाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bhiwandi

    पुढील बातम्या