Home /News /maharashtra /

कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आल्यानंतर भिवंडीतील गरोदर महिलेने दाखवली जागरुकता, कुटुंबालाच केलं क्वारन्टाइन

कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आल्यानंतर भिवंडीतील गरोदर महिलेने दाखवली जागरुकता, कुटुंबालाच केलं क्वारन्टाइन

भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील एका गरोदर महिलेने जागरुकता दाखवतल्याचं पाहायला मिळालं.

भिवंडी, 20 एप्रिल : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे भिवंडीत पालन होत नसल्याचं चित्र आहे. मात्र भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील एका गरोदर महिलेने जागरुकता दाखवत कोरोनाचा धोका पाहता स्वतःच सर्व कुटुंबाला क्वारन्टाइन केलं आहे. ही महिला वसई तालुक्यातील जूचंद्र इथं दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. तपासणीसाठी सदर महिला दवाखान्यात आपल्या पती, जाऊ, मुलगी यांना घेवून गेली होती. त्या दवाखान्यात कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच असल्याचे तिला समजताच तिने जागरूकता दाखवत गावात येऊन लगेच पोलीस पाटीलांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली. गरोदर महिला, पती,  जाऊ आणि मुलगी असे सर्व कुटुंबच भिवंडीतील आमंत्रण इथं क्वारन्टाइन झाले आहे. या घटनेमुळे भिवंडीतील गर्दी करणारे,  मोकाट फिरणारे आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. तसंच कोरोनाबाधितांच्या संर्पकात आलेल्या नागरिकांनी सुद्धा कोरोनाचा  धोका टाळण्यासाठी स्वतः क्वारन्टाइन व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.    भिवंडीतील गावांचे मुख्यप्रवेशद्वार बंद करण्यास सुरुवात भिवंडी शहरात 3 आणि ग्रामीण भागात 3 असे कोरोनाचे सहा रुग्ण सापडल्याने आता ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बाहेरील नागरिकांना प्रवेश देण्यास  मज्जाव केला आहे. या अनुषंगाने गावांचे मुख्य प्रवेशद्वार बांबू, काट्या व दगडांनी बंद केले जात आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याची गंभीर दखल घेऊन ग्रामीण भागातील शेलार, मिठपाडा सह बहुसंख्य गावातील गावकऱ्यांनी आपल्य गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर रस्ते बंद करण्यात येत आहे तर दुसऱ्या तालुक्यातून, जिल्हातून  येणाऱ्या नागरिकांवर सुद्धा येथील युवक लक्ष ठेवून आहेत.  संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या