Home /News /maharashtra /

कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळली; 3 बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना

कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळली; 3 बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, भिवंडीतील हृदयद्रावक घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

भिवंडीतील टेंभिवली गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला आहे. वीटभट्टवीर कोळसा भरलेल्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये तीन बहिणींचा मृत्यू झाला आहे. (3 sisters died after coal truck trolley collapsed on slum house in Bhihwandi)

    भिवंडी, 27 जानेवारी : भिवंडीत एक भीषण अपघात (major accident in Bhiwandi) झाला आहे. कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली (truck trolley) वीटभट्टीच्या शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या दुर्घघटनेत तीन बहिणींचा मृत्यू (3 sisters died in accident) झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने संपूर्ण घरच कोळशाच्या खाली गाडले गेले आणि त्यात घरातील सदस्यही होते. नेमका कसा झाला अपघात? भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावाच्या परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोळसा खाली करत असताना ट्रकचा शॉकअप्सर अचानक तुटला. त्यानंतर कोळशाने भरलेल्या ट्रकची ट्रॉली शेजारी असलेल्या झोपडीवर कोसळली. या झोपडीत वीटभट्टीवर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. वाचा : पवनची बर्थ डे पार्टी शेवटची ठरली, त्या 7 विद्यार्थ्याच्या अपघाताआधीचा VIDEO तीन बहिणींचा मृत्यू कोळसा भरलेली ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने संपूर्ण झोपडी कोळशाखाली गाडली गेली. या घटनेने एकच खळबळ उडाली. तात्काळ मजुरांनी एकत्र येत कोळसा बाजुला करण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही बहिणी झोपल्या होत्या टेंभिवली गावात असलेल्या वीटभट्टीवर कोळसा आवश्यक असतो. त्यासाठी तेथे ट्रकमधून सातत्याने कोळसा आणला जात असतो. मंगळवारीही कोळसा भरलेला ट्रक वीटभट्टीवर आला. ट्रकमधून कोळसा खाली करत असताना शॉकअप्सर तुटला आणि ट्रकची ट्रॉली थेट शेजारील झोपडीवर कोसळली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी झोपडीत मजुराची पत्नी आणि तीन मुले होती. दुर्दैवाने या अपघातात तीन बहिणींचा मृत्यू झाला. तिन्ही बहिणी झोपडीत झोपल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे. वाचा : मुंबईत मोठी दुर्घटना, चार मजली इमारत कोसळली तर झोपडीतील मजुराची पत्नीला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तिन्ही बहिणी या तीन ते सात वर्षांच्या वयोगटातील होत्या. या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्याच या तीन मुली होत्या. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भिवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Bhiwandi

    पुढील बातम्या