महिन्याभरात होणार होतं तरुणीचं लग्न; पण त्याआधीच उद्ध्वस्त झाली स्वप्न

जीवघेण्या खड्ड्यांनी उदध्वस्त केली स्वप्न, दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर असणाऱ्या तरुणीचा मृत्यू .

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 02:50 PM IST

महिन्याभरात होणार होतं तरुणीचं लग्न; पण त्याआधीच उद्ध्वस्त झाली स्वप्न

रवी शिंदे,(प्रतिनिधी)

भिवंडी, 10 ऑक्टोबर: लग्नाची स्वप्न रंगवणाऱ्या आणि लोकांना जीवदान देणाऱ्या डॉ. तरुणीवरच काळानं घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांनी डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची आयुष्य़ाची स्वप्न उद्ध्वस्त केली. भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. भिवंडीत वाडा रोडवर दुगाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर असणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ.नेहा आलमगिर शेख असं या 23 वर्षीय तरुणीचे नाव असून या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अनगाव येथील टोल नाका बंद केला आहे.

नेहाचं पुढच्या महिन्यात लग्न होतं. लग्नाची अनेक स्वप्न रंगवली होती. नव्या जीवनाची सुरुवात नव्या अशा आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नेहाबाबत मात्र काळानं घात केला. बोहल्यावर चढण्याआधीच नेहाचा खड्ड्यांमुळे भीषण अपघात झाला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ.नेहा शेखचा कसा झाला अपघात

लग्नाची खरेदी झाल्यानंतर नेहा ठाण्याहून भिवंडीला निघाली होती. दरम्यान त्याच वेळी दुचाकी अचानक खड्ड्यात आदळल्यानं आणि नेहाचा तोल गेला. तिला सावरण्याचा एक क्षणही मिळाला नाही आणि ती खाली पडली. याच वेळी मागून येत असलेल्या भरधाव ट्रकचं चाक नेहाच्या अंगावरून गेल्यानं तिचा मृत्यू झाला आहे.

Loading...

वारंवार खड्ड्यांबाबत पालिकेकडे प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्यानं एका बाजूला नागरिक संताप्त व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे नेहाच्या जाण्यानं शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

संगमनेरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात

संगमनेर तालुक्यात ट्रक आणी कारच्या झालेल्या भीषण अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावर कऱ्हे घाटाजवळ भरधाव कार ट्रकवर आदळली.धडक एवढी भीषण होती की कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला तर कारचाही चुराडा झाला आहे.

भरधाव कंटेनरने चेकपोस्टमध्ये घुसून तिघांना चिरडलं; 2 पोलिसांचा जागीच मृत्यू

सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. येडशी जवळ चेकपोस्टमध्ये कंटेनर घुसल्यानं दुर्घटना घडली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून होमगार्ड गंभीर जखमी आहे. तुळजापूरला जाणाऱ्या मोठ्या चारचाकी वाहनांना वळवण्यासाठी हा चेकपोस्ट उभा केला होता.नवरात्रोत्सव संपल्यामुळे भाविक पुन्हा आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गावर वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी चेकपोस्ट उभे केले होते. रात्री 3.30 च्या सुमारास अर्धा झोपेत असलेल्या पोलिसांच्या अंगावर अचानक कंटेनर आला आणि घात झाला. चेकपोस्ट जिथे आहे त्या ठिकाणी मात्र पोलिसांनी सिग्नल, लाईट सुरू न ठेवल्यानं कंटेनर चालकाला त्याची कल्पना नव्हती. भरधाव कंटेनर थेट चेकपोस्टमध्ये घुसला आणि भीषण अपघात झाला आहे.

'...तुझ्या बायकोला घेऊन ये', पुण्यातील मुथूट फायनान्सच्या महिलेचा फोन कॉल व्हायरल, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...