भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

पॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाला मोठी आग लागली.

  • Share this:

भिवंडी, 29 नोव्हेंबर :  भिवंडीत एका सार्वजनिक शौचालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास भिवंडीतील कल्याण रोडवरील  वीजवितरणच्या पॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाला मोठी आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण सार्वजनिक  शौचालय जळून खाक झाले आहे.

....तर मोठी दुर्घटना घडली असती

भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील जुने पॉवर हाऊस असून या ठिकाणावरून वीजपुरवठा करण्यात येतो. तर त्याच्याच बाजूला अधिकारी - कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. हा परिसरात रहदारीचा व नागरी वस्तीचा असल्याने भिवंडी महापालिकेने 20 ते 25 वर्षांपूर्वी पॉवर हाऊस समोरच्या फुटपाथवर नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारले होते.

कालांतराने याठिकाणी फायबरचे  शौचालय उभारण्यात आले. मात्र हेही शौचालय दुरवस्थेत असूनही  महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. परिसरातील नागरिक या  शौचालयाचा वापर करीत होते. त्यातच आज सकाळच्या सुमाराला अचानक  शौचालयाला आग लागली. हे शौचालय फायबरचे असल्याने या आगीने काही वेळात भीषण रूप धारण केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची 1 गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण शौचालय जळून खाक झाले. सुदैवाने ही आग लगत असलेल्या पॉवर हाऊसला असलेल्या उंच भिंतीमुळे आत पसरू शकली नाही. जर आगीच्या कचाट्यात  पॉवर हाऊस सापडलं असतं तर मोठी दुर्घटना घडली असती. विशेष म्हणजे आग लागली त्यावेळी  शौचालयात कोणीही नव्हते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.  तर आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

Published by: Akshay Shitole
First published: November 29, 2020, 11:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading